Ad will apear here
Next
राकेश बापट घडवतोय स्वहस्ते बाप्पाची मूर्ती
मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सविता दामोदर परांजपे' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता राकेश बापट गेले महिनाभर गणपतीबाप्पाच्या तयारीत मग्न आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तो बाप्पाची मूर्ती स्वहस्ते तयार करत आहे. या वेळी तो नेमकी कुठली मूर्ती साकारतोय, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. 

उत्तम अभिनेता असणारा राकेश उत्तम शिल्पकार आणि चित्रकारही आहे. दरवर्षी तो बाप्पाची वेगवेगळ्या रूपातील मूर्ती साकारतो. गेल्या वर्षी त्याने साकारलेल्या मूर्तीची सर्वत्र चर्चा होती. अभिनेता ऋत्विक धनजानीनेही गेल्या वर्षी राकेशच्या मार्गदर्शनाखाली बाप्पाची मूर्ती साकारली होती. 

याबद्दल बोलताना राकेश सांगतो, ‘गणेशमूर्ती तयार करण्याची परंपरा माझ्या घरी पूर्वीपासून आहे. मी गेले अनेक वर्ष गणपतीची मूर्ती तयार करतोय. गणपती बनवताना कोणत्या आकाराचा किंवा तो कोणत्या संकल्पनेवर बनवायचा हे मी कधीच आधी ठरवत नाही, मला फक्त बाप्पा साकारायचा असतो. गेल्या वर्षी नदीच्या गाळाचा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून बाप्पाची मूर्ती साकारली होती. या वर्षीची मूर्ती  बनवण्याचे काम सुरू असून, लवकरच ते पूर्ण होईल आणि सर्वांना माझा बाप्पा आवडेल,अशी मला खात्री वाटते.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZVXBS
Similar Posts
नाना पाटेकर यांच्या आवाजात ऐका गणपतीची आरती मुंबई : नाना पाटेकर यांचे गणपतीबाप्पावरील प्रेम आणि भक्ती सर्वश्रुत आहे. त्यांची गणपतीवर दृढ श्रध्दा असून, दरवर्षी ते आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात. त्यासाठी सुंदर सजावट करतात. साग्रसंगीत पूजाअर्चा, आरती यांनी त्यांचे घर गजबजून गेलेले असते. यंदा आता नाना पाटेकर तुमचाही गणेशोत्सव अविस्मरणीय करणार आहेत
कलाकारांच्या घरचा गणेशोत्सव गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी सगळे जण सज्ज झाले आहेत. घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. सर्वत्र एक आगळा उत्साह आहे. चैतन्यमय वातारवण निर्माण झाले आहे. कलाकार मंडळीही बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी करत आहेत. त्यांच्या घरचा गणेशोत्सव कसा साजरा होतो, ते यंदा तो कसा साजरा करणार आहेत, त्यांनी काय तयारी केली आहे, याविषयी जाणून घेऊ या त्यांच्याचकडून
गणेशोत्सवासाठी परदेशी पर्यटकांकरता गिरगाव चौपाटीवर विशेष सुविधा मुंबई : परदेशी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या दिमाखदार गणेशोत्सवाचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे खास व्यवस्था करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या
‘आरबीके’च्या विद्यार्थ्याचे यश मुंबई : आर. बी. के. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये सातवीत शिकणाऱ्या आदित्य श्रीवास्तव या विद्यार्थ्याला ‘नॅशनल अचिव्हर्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. एक हजार रुपये, ‘मॅप माय स्टेप डॉट कॉम’चे प्रीपेड स्क्रॅच कार्ड, सीडी, सुवर्णपदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याने नॅशनल लेव्हल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language